अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर महा विकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून ईडी च्या आणि केंद्र सरकारच्या विरोधात महा विकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी आंदोलन केले. मंत्रालयाच्या परिसरात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या समोर बसून शांततेने सुरू असलेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनात केंद्र सरकार च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून करण्यात आली. केंद्र सरकार राज्याच्या कारभारामध्ये केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून हस्तक्षेप करत आहे. नेत्यांना मंत्र्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र याचा कडवट प्रतीकार येणाऱ्या काळामध्ये केला जाईल असा इशारा महाविकासआघाडी कडून देण्यात आला आहे. या आंदोलनात केंद्रसरकार आणि तिच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी कार्यकर्ता तसेच नेत्यांकडून करण्यात आली.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे मंत्री मोठ्या प्रमाणात सहभागी झाले असले तरी आज शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्री सुभाष देसाई वगळता इतर मंत्री किंवा ज्येष्ठ नेते अनुपस्थित राहिल्याने शिवसेनेच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र उत्तर प्रदेश मधील ज्येष्ठ नेत्यांचा दौरा आणि आंगणेवाडीची जत्रा असल्याने शिवसेनेचे जेष्ठ नेते मंडळी आणि मंत्री अनुपस्थित असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून सांगण्यात आले होते.
0 Comments