गोवा राज्यातील सव्वा कोटींचा विदेशी मद्यसाठा सोलापुरात जप्त


सोलापूर-राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने सोलापुरात मोठी कारवाई केली आहे. मंगळवेढा मार्गे सोलापूर शहरात दाखल होत असलेला सव्वा कोटींचा विदेशी मद्यसाठा जप्त करून कारवाई केली आहे. दोन कंटेनर भरून विविध कंपनीची दारू विक्रीसाठी सोलापुरात आणले जात होते. गोवा राज्यात येथे तयार झालेल्या मद्याच्या किंमती महाराष्ट्र राज्यातील मद्याच्या किंमती पेक्षा कमी आहे. त्यामुळे दारू तस्कर गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यात आणतात आणि त्यावरील लेबल बदलून महाग किंमतीत विकतात. महसूल बुडवून कोट्यावधी रुपयांची मद्य विक्रीचा बेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने हाणून पाडला आहे.

खबऱ्याने मुंबईच्या भरारी पथकाला दिली- 
माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई येथील भरारी पथकाला माहिती दिली. गोवा बनावटीचा कोट्यावधी रुपयांचा मद्यसाठा महसूल बुडवून छुप्या मार्गाने सोलापुरात जाणार आहे. या माहितीवरून सोलापुरातील भरारी पथकाने मंगळवेढा येथे सापळा लावला. कंटेनरवर नजर ठेवून राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने कारवाई केली. 1 कोटी 25 लाख 94 हजार रुपयांचा मद्यसाठा आणि दोन कंटेनर जप्त केले आहे.

रात्रभर पाळत ठेवून सव्वा कोटींचा विदेशी दारू साठा जप्त-
 राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने सोलापूर मंगळवेढा महामार्गावर पाळत ठेवली होती. खबऱ्याने माहिती दिल्या प्रमाणे माल बुधवारी रात्रीच पोहोचणार होता. त्यामुळे भरारी पथकाने बुधवारी रात्र भर एका गुप्त ठिकाणी पाळत ठेवली होती. दारू तस्कर यांच्या दिलेल्या सूचनेनुसार कंटेनर चालक रात्रभर लपून बसले होते. गुरुवारी 3 फेब्रुवारी रोजी सकाळी कंटेनर महामार्गावर येताच राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आणि कंटेनरची कसून तपासणी केली.कंटेनरमधील सर्व मुद्देमाल जप्त करून दोन संशयीत इसमाना ताब्यात घेतले आहे.

*दोन्ही संशयित कंटेनर चालकांना ताब्यात घेतले-
 राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी कंटेनर क्रमांक एन एल -02-के-1133,एन एल-02-के-1127 असे दोन कंटेनर जप्त केले आहे. त्यामधील चालक चंद्रकांत गजेंद्र शेरे (वय 24 वर्ष, रा. उडेगाव ता. परांडा, जि उस्मानाबाद), महावीर मारुती भोसले (वय 36 वर्ष, रा. पोखरापूर, ता. मोहोळ, जि सोलापूर) या संशयित इसमाना ताब्यात घेतले आहे.

मूळ मालकाचा शोध सुरू-
 1 कोटी 25 लाख रुपयांची विदेशी दारू सोलापुरात कोण घेणार होता. तसेच गोवा येथील कोणत्या कंपनी मधून मद्यसाठा वितरित करण्यात आला. याबाबत सर्व माहिती घेऊन संबंधित आणि संशयित आरोपीवर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 ही कारवाई-
भरारी पथकातील निरीक्षक संताजी लाड, मनोज चव्हाण, प्रशांत निकाळजे, प्रमोद कांबळे, मलंग तांबोळी, अमोल हिप्परकर, सुधीर देसाई यांच्या टीमने केली आहे. याचा अधिक तपास दुय्यम निरीक्षक प्रशांत निकाळजे करत आहेत.


Post a Comment

0 Comments