नवऱ्यांचाही होतोय छळ; बायकांविरुद्ध २८५ तक्रारी!


औरंगाबाद मध्ये गेल्या वर्षात बायकोकडून नवऱ्याचा छळ झाल्याच्या तब्बल २८५ तक्रारी महिला सहाय्य कक्षाकडे (भरोसा) दाखल झाल्या आहेत. त्यातील तब्बल २६३ तक्रारी भरोसा सेलकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, तर २२ अर्जाची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती भरोसा सेलच्या प्रमुख सहायक निरीक्षक सुषमा पवार यांनी दिली. 

कुटुंबात महिलांवर होणारे अन्याय, अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयात महिला सहाय्य कक्ष सक्षमपणे कार्यरत आहे. या कक्षाकडे वर्षभरात तक्रारींचा ओघ सुरू असतो. त्यातील प्रत्येक तक्रारीवर समाधानकारक तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त अपर्णा गिते यांच्या नेतृत्वात भरोसा सेलसह दामिनी पथक महिलांच्या मदतीला धावून जात आहे. 

भरोसा सेलचा पदभार मागील काही महिन्यांपासून सहायक निरीक्षक सुषमा पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यांच्या कार्यकाळात २ हजार ७९ अर्जापैकी १ हजार ९०६ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments