त्यांच्या निधनानंतर मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. जगभरातील सेलिब्रिटी त्यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली देत आहेत. पण यादरम्यान अभिनेत्री अंकिता लोखंडेनं असा काही 'प्रताप' केला की, नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला. यानंतर अंकिता सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली. होय, एकीकडे संपूर्ण देश लतादीदींना श्रद्धांजली वाहत असताना दुसरीकडे अंकिता लोखंडेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. लता यांच्या निधनानंतर तासाभरात तिने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले. या व्हिडीओमध्ये अंकिता पती विकी जैनसोबत कारमध्ये 'बिजली बिजली' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
एकीकडे लतादीदींच्या निधनावर संपूर्ण देश शोक करत असताना अंकिताचं हे उथळ वागणं पाहून पाहून युजर्स खवळले. मग काय, नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं. 'अरे काही तर लाज बाळग, हे सर्व उद्याही करू शकतेस,'असं एका युजरने लिहिलं. 'मूर्ख मुली, लताजी सुद्धा इंदूरच्या आहेत आणि तू पण. काही तर लाज ठेव,'अशी संतप्त प्रतिक्रिया एका युजरने दिली. 'अंकिता, तुला माहितीये का, लताजी आपल्यात नाहीत,' अशा शब्दांत एका युजरने तिला तिची चूक लक्षात आणून दिली.
इतकं ट्रोल होऊनही अंकिताने तो व्हिडीओ डिलीट केला नाही. पण हो यानंतर लगेच लता दीदींच्या निधनावर शोक व्यक्त करणारी पोस्ट तिने शेअर केली. 'शायद फिर इस जनम में मुलाकात हो ना हो,'असं कॅप्शन देत तिने लतादीदींना एक फोटो शेअर केला.
.
0 Comments