बार्शी! खराब मशीन देऊन बार्शीतील व्यापाऱ्याची ८८ हजाराची फसवणूक ; एका विरुद्ध गुन्हा दाखल



बार्शी/प्रतिनिधी:

गुजरात मधील एका व्यापाऱ्याने बंद पडलेली खराब मशीन बार्शीकर नागरिकाला विकून ८८ हजाराचे फसवणूक केल्याबद्दल अनिल विश्वभंर घंटे (वय ४२) रा. वाणी प्लट, आगळगावरोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडू बनवण्यासाठी लागणारे मशीन फिर्यादीने गुजरातच्या व्यापाऱ्याकडून मागवली. त्याची रोख रक्कम ८८ हजारही त्याच्या खात्यात पाठवली. त्या व्यापाऱ्याने मशीन हे पाठवून दिले परंतु ते मशीन खराब व नादुरुस्त निघाले त्यामुळे ते रिटन पाठवण्यात आले. वेळोवेळी पैशाची मागणी करूनही त्याने पैसे ट्रान्सफर केले नाहीत, फिर्यादीला आपली फसवणूक झाली हे समजताच त्यांनी तालुका पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार शामनिकूंज वल्लभदास मारवानिया रा. लोटस टवर, झंझर्डारोड, जुनागढ राज्य-गुजरात यांनी लाडू बनविण्याची मशीन देतो असे विश्वासाने सांगून माझ्याकडून ८८,५००/- रु. घेवुन मला नादुरुस्त मशीन देवुन व सदरची मशीन परत घेवुन जाऊन मला माझे पैसे न देता माझी ८८,५००/- रु. फसवणूक केली आहे.

Post a Comment

0 Comments