बार्शी! शिवाजी कॉलेज परिसरात एकांला ; ७ जणांनी मिळून केली बेदम मारहाण



बार्शी/प्रतिनिधी:

व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर शिवाजी महाविद्यालयाच्या परिसरात एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. कुणाल दिपक कसबे वय १७)वर्ष  रा. उपऴाई रोड नाईकवाडी प्लट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचा मित्र मोटर सायकल वरून कॉलेजला येत असताना सुरक्षा रक्षकांनी मास्क लावायला सांगितल्यामुळे गाडी थांबवली असता, तू कॉलेजमध्ये यायचं नाहीस असं म्हणत सात जणांनी मिळून बेदम मारहाण केली आहे. लाथाबुक्क्यांनी व हत्यार आणि मारहाण केली आहे, फिर्यादी या मारहाणीमध्ये बेशुद्ध झाला होता, त्याच्यावर बार्शी शहरातील जगदाळे मामा हॉस्पिटल मध्ये उपचार चालू आहेत. शुद्धीवर आल्यावर वडिलांसमवेत शहर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीनुसार १. शशिकांत कदम, २.समर्थ खडसरे  ३. समाधान बोबडे  ४. अभि बोबडे ५. भैया बारंगुऴे व इतर दोन जण (त्यांचे नाव पत्ता माहीत नसुन त्यांना पाहिल्यास मी त्यांना ओळखु शकतो) या सात जणांविरुद्ध भादवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२३,३२४ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments