नात्याला काळीमा! तुळजापूरात सख्या भावाने केला विनयभंग


नात्याला काळीमा फासणारी घटना तुळजापूर शहरात घडली आहे. तुळजापूर शहरातील २८ वर्षीय महिलेवर स्वतःच्या सख्या भावाने विनयभंग केल्याची घटना दिनांक ८ फेब्रुवारी रोजी घडली आहे याप्रकरणी पीडित महिलेने सख्ख्या भावाच्या विरोधात तुळजापूर पोलीस स्टेशन येथे विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे 

याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, तुळजापूर शहरातील २८ वर्षीय महिला आपल्या आईवडिलांच्या घरी राहत आहे. दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पीडित महिलेचे आई वडील हॉलमध्ये असताना पीडित महिला जेवण केलेले भांडी ठेवण्यासाठी किचन रूम मध्ये एकटी गेली असताना आरोपी भावाने पीडित बहिणीच्या पाठीमागे किचनमधे जाऊन फिर्यादी बहिणीला पाठीमागे किचन रूममध्ये येऊन फिर्यादी बहिणीला वाईट हेतूने पाठीमागून धरून विनयभंग केला तसेच फिर्यादी महिलेने मदतीसाठी आईला दिला त्यावेळी आरोपी भावाने बहिणीच्या पोटावर लाथाबुक्क्यांनी मारून ओरडू नको म्हणुन तोंड दाबुन ओढाओढी केली. पीडित महिलेचे आई वडील सोडवण्यासाठी आले असता त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मुक्कामार दिला व झालेला प्रकार बाहेर कोणास सांगितला तर तुमचे तीन खडे भिजवतो अशा प्रकारची धमकी दिली 

अशा प्रकारची पीडित बहिणींनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस स्टेशन येथे सख्या भावाविरुद्ध भादवि कलम 354, 354 (अ )323, 504, 506 नुसार विनयभंगाचा गुन्हा तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिनांक 9 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास  मुंजळे करत आहेत

Post a Comment

0 Comments