बार्शी तालुक्यातील खडकोणी येथे दीराने आणि भावजईला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. फिर्यादी महादेव दगडू नलवडे (वय वर्षे 73) राहणार खड़कोणी,ता.बार्शी यांना शुक्रवार,दि.25 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरासमोर फिर्यादीचा लहान भाऊ आरोपी भारत दगडू नलवडे याने 'जागा माझी आहे.तुम्ही येथे मुरूम टाकू नका' असे म्हणून फिर्यादीस व फिर्यादीची पत्नी रुक्मिणी महादेव नलवडे यांनी शिवीगाळ केली आहे.तसेच फिर्यादीच्या बायकोच्या नाकावर व कपाळावर दगड फेकून मारून तिला गंभीर जखमी केले आहे.म्हणून आरोपी विरुध्द बार्शी पोलीस ठाण्यात भा द वि कलम संहिता ३२६ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड हे करीत आहेत. ही माहिती सोलापूर ग्रामीण पोलिस दलाकडून रविवार,दिनांक 27 फेब्रुवारी रोजी प्रेसनोटच्या माध्यमातून देण्यात आली आहे
0 Comments