मुक्ता बापू धोत्रे अंदाजे (वय ७५) या बीड जिल्ह्यातील वयस्कर आजी दृष्टी कमी, थोड्या प्रमाणात स्मृतिभ्रंश असल्याने अनोळखी व्यक्तीने योग्य ठिकाणी सोडायच्या खोट्या आश्वासनाने रस्ता भटकत दिनांक ७ फेब्रुवारी रोजी मौजे. तळंदगे, तालुका हातकणंगले या गावात पोहोचल्या, या आजींच्या राहण्याची सोय पोलीस पाटील जनाब समीर मुल्लानी यांनी एक दिवस स्वतःच्या कार्यालयात केली तर दुसऱ्या दिवशी संदीप पोळ यांनी स्वतःच्या राहत्या घरी त्यांची खाण्याची व आरामाची सोय केली व आजींकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, आजींनी स्वतःचं नाव जरी व्यवस्थित सांगितल असलं तरी गावाचं नाव सांगताना आजी वेगवेगळ्या गावांची नावे सांगत असल्याने नेमक्या गावाचा पत्ता काढण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या.
संदीप पोळ यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांशी फोन द्वारे संपर्क करायला सुरवात केली, सोबतच गुगल मॅप सारख्या एप्लिकेशन्स वरून आजींच्या राहत्या ठिकाणापासून आठ किलोमीटर किलोमीटर असनाऱ्या न्यु इंडिया बेकरीचे मालक जनाब हमीद खान यांना संपर्क करून संबंधित पोलीस स्टेशनला व्यक्तिशः भेटण्याची विनंती केली. तेथील हवालदार गौतम वाघमारे यांनी अविनाश गवळी यांचा संपर्क देऊन समांतर पातळीवर इतर अधिकाऱ्यांची बोलून मदत घेण्याचा प्रयत्न चालू ठेवला, त्यातूनच हवालदार अविनाश गवळी यांचा संपर्क मिळाला, शिवाय आजींचे गाव काळेगाव हवेली ज्या पोलीस स्टेशन च्या अंतर्गत येते त्या पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांशी बोलून गावातील हवालदार गवळी यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन शोध घेऊन आज्जींच्या नातेवाईकांचा संपर्क मिळवायचा प्रयत्न केला.
दरम्यान इतर माहितीतून काळेगाव हवेलीचे सरपंच बाळकृष्ण पवार यांना ही संदीप पोळ यांनी संपर्क केला, सरपंच पवार यांनी आपल्या प्रयत्नातून बाहेरगावी असणाऱ्या आजींच्या नातवांची संपर्क काढून आजींचा पत्ता त्यांना कळवला. त्या संपर्कातून आजीच्या घरच्यांना कळवून आजींच्या जवळचे नातेवाईक जे कारखान्याच्या कामावरती सध्या कोल्हापूर जिल्ह्यातच होते ते तळंदगे येथे पोहचले, त्यांची सरपंच काळेगाव हवेली यांच्याशी बोलून खातर जमा करून आजींना रात्री उशिरा त्यांच्या सोबत सुखरूप पाठवण्यात आले.
यावेळी तळंदगे पोलीस पाटील समीर मुल्लानी, संदीप पोळ, बाबासाहेब पोळ, सचिन चौगुले, जावेद नायकवडे हें ही उपस्थित होते. सर्व धर्मियांनी तशेच सर्व क्षेत्रातील लोकांनी एकत्र येऊन आजींना त्यांच्या आप्तेंष्टाची भेट घडवून देऊन "खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे या उक्तीनुसार आजींची घरवापसी केली आहे.
या कार्यात सकाळपासून तळंदगे,हुपरी, कोल्हापूर, सातारा, बीड जळगाव,पुणे या भागातील विविधक्षेत्रातील मान्यवर, अधिकारी ,पत्रकार, यांनी ही मोठा पुढाकार घेतला.
आशीत कांबळे, प्रशिक्षु आयपीएस जळगाव.रश्मीता राव. प्रशिक्षु आयपीएस, बीड, अमृत तांबारे. डी.वाय.एस.पी, सातारा, सुशील संसारे , गट विकास अधिकारी, कागल संदीप पोळ सामाजिक कार्यकर्ते, तळंदगे, किरण भवरे, उपसंपादक, ॲग्रोवन पुणे, धनाजी कांबळे उपसंपादक, बाळासाहेब कांबळे, पत्रकार दैनिक, सकाळ, सचिन सावंत, एपीआय, हुपरी पोलीस स्टेशन, सोनवणे, हवालदार, बीड, हमीद खान, बेकरी मालक वढवणी, गेवराई, गौतम वाघमारे, हवालदार, वडवणी, पोलीस स्टेशन, अविनाश गवळी, हवालदार, वडवणी पोलीस स्टेशन, बाळकृष्ण पवार सरपंच, काळेगाव हवेली जिल्हा, बीड या सर्वांनी सत्कार्यात भाग घेऊन या घरवापसीत यश आणले.
0 Comments