पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाने लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार बलात्कार केला आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारत देसडला असे त्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. एका महिलेने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप भारत देसडला यांच्यावर केला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात मंगळवारी (१५ फेब्रुवारी ) गुन्हा दाखल केला आहे.
भारत देसडला हे घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष होते. देसडला यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने साहित्य क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, देसडलांवर गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.
0 Comments