सोलापूर! नांदणी येथील परमीट रूम दरोडयाची कुख्यात आरोपी जेरबंद



सोलापूर/प्रतिनिधी:

दिनांक १४.०२.२०२२ एल. सी. बी. सोलापूर ग्रामीणची धडाकेबाज कामगिरी कुविख्यात आंतरराज्यीय गुन्हेगार पोलीसांच्या जाळ्यात नांदणी येथील परमीट रूम बारवरील दरोडयाची उकल तसेच मंद्रुप पोलीस ठाणेकडील ०३ व कामती पोलीस ठाणे कडील ०१ घरफोडयांची उकल ८ लाख ८०,००० रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त.

 फिर्यादी गंगाराम बयाजी वाघमोडे, वय ३४ वर्षे, व्यवसाय - हॉटेल मॅनेजर, रा. शिरनांदगी, ता. मंगळवेढा जि. सोलापूर हा मौजे नांदणी ता. दक्षिण सोलापूर येथील हॉटेल निसर्ग परमीट रूम येथे मॅनेजर म्हणून कामकाज करत असून ते रात्री त्याच ठिकाणी झोपला होते. अचानक पहाटे ०२:०० वा. च्या सुमारास अनोळखी काही इसम हॉटेलमध्ये आले व त्यांनी फिर्यादी झोपलेला असल्याचे पाहून त्याचे तोंडावरील चादर ओढली व त्यातील एकाने फिर्यादीचे हात व एकाने पाय पकडून मारहाण करून हातास दोरीने बांधून, पायास टॉवेलने बांधून फिर्यादीच्या तोंडास कापडाने बांधले. यातील फिर्यादी याने कोण आहे ? असे विचारले असता ते काही एक बोलत नसून त्यातील एकाने फिर्यादीचे खिसे तपासून दिवसभर दारू विकून आलेली फिर्यादीच्या खिशातील २०,००० रु. रोख रक्कम व फिर्यादीचा विवो कंपनीचा एस १ कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीस एका रूममध्ये बंद करून बाहेरून कडी लावून हॉटेलमधील विदेशी कंपनीचे दारूचे बॉक्स (इम्पेरीअल ब्लु कंपनीचे २८ बॉक्स प्रत्येकी बॉक्स मध्ये ४८ बॉटल ) असा एकूण २,३१,६०० रु. किंमतीचा ऐवज दमदाटी करून जबरदस्तीने चोरून नेले म्हणून मंद्रप पोलीस ठाणे येथे गुरंन १७/२०२२भा.द.वि.  का. क ३९५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. 

सदर गुन्हयाचे ठिकाणी मा. पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम, अपर पोलीस अधिक्षक श्री. हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे व मंद्रुप पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेटी देवून त्याबाबत माहिती घेतली. सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणणेकामी मा. पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम, अपर पोलीस अधिक्षक श्री. हिंमत जाधव यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोनि सर्जेराव पाटील यांनी सपोनि रविंद्र मांजरे यांचे ०१ पथक तयार करून त्यांना गुन्हा उघडकीस आणण्याकामी सुचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे सोलापूर ग्रामीण जिल्हयात मागील काही दिवसापासून परमीट रूम बीअरबार वर घरफोडी करून दारूच्या बॉक्सची चोरी अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या. त्या अनुषंगाने माहिती काढली असता सदरचा गुन्हा हा मौजे होटगी ता. दक्षिण सोलापूर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी त्यांचे इतर साथिदारांच्या मदतीने मिळून केला असून त्यापैकी एक इसम हा सलगरवस्ती भागात आला असल्याची गोपनीय माहिती सपोनि रविंद्र मांजरे व त्यांचे पथकास मिळाली. त्यावरून सपोनि रविंद्र मांजरे व त्यांचे पथक सोलापूर शहर येथील सलगरवस्ती या ठिकाणी - जावून मिळालेल्या बातमीप्रमाणे तेथून एका इसमास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमाकडे व्यवसायिक कौशल्यपूर्ण तपास केला असता, त्याने गुन्हयाची कबूली देवून त्याबाबत सांगितले की, त्याचे गांवातील मौजे होटगी येथील त्याच्या ओळखीच्या एका इसमाच्या सांगण्यावरून मागील ५ ते ६ दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास एका पांढ-या रंगाध्या बोलेरो जिपवर चालक म्हणून जावून मौजे नांदणी ता. दक्षिण सोलापूर येथील एका हॉटेलमधून विदेशी दारू

बॉक्स चोरून मौजे होटगी ता. दक्षिण सोलापूर येथे उतरून एका रूममध्ये ठेवले असल्याचे सांगितले. त्यानंतर सदर - गाडीसह देवकार्याकरीता गेला असून तो त्यावे देवकार्य करून मौजे होटगी ता. दक्षिण सोलापूर येथे येणार • असलेबाबत बातमी मिळाल्याने मिळालेल्या बातमी प्रमाणे अक्कलकोट येथील वागदरी जाणा-या रोडजवळील नविन ब्रिज येथे सापळा लावला असता थोड्या वेळानंतर बातमी प्रमाणे सदरची गाडी आल्यानंतर त्यास आडवून सदरची
गाडी व इसम ताब्यात घेवून सदर इसमाकडे त्यांचे नांव व पत्ता बाबत विचारणा करून बातमी प्रमाणे खात्री केल्यानंतर त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने कौशल्यपूर्ण व तांत्रिक चौकशी करून त्याचेकडून सोलापूर ग्रामीण जिल्हयातील ०१ दरोडा व ०४ घरफोडी गुन्हयांची उकल झालेली असून ती खालील प्रमाणे.

अ.नं. पोलीस ठाणे
 मंद्रुप पोलीस ठाणे २ कामती पोलीस ठाणे

गुरंन व कलम

१७/२०२२ भादविसंक ३९५ प्रमाणे.

१५/२०२२ भादविसंक ४५७, ३८० प्रमाणे २२२/२०२१ भादविसंक ४५४, ४५७, ३८० प्रमाणे.

३ | मंदुप पोलीस ठाणे | मंडुप पोलीस ठाणे

प्रेस नोट :- दिनांक १४.०२.२०२२ एल. सी. बी. सोलापूर ग्रामीणची धडाकेबाज कामगिरी कुविख्यात आंतरराज्यीय गुन्हेगार पोलीसांच्या जाळ्यात नांदणी येथील परमीट रूम बारवरील दरोडयाची उकल तसेच मंद्रुप पोलीस ठाणेकडील ०३ व कामती पोलीस ठाणे कडील ०१ घरफोडयांची उकल ८ लाख ८०,००० रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त.

दिनांक ०६.०२.२०२२ रोजी यातील फिर्यादी गंगाराम बयाजी वाघमोडे, वय ३४ वर्षे, व्यवसाय - हॉटेल मॅनेजर, रा. शिरनांदगी, ता. मंगळवेढा जि. सोलापूर हा मौजे नांदणी ता. दक्षिण सोलापूर येथील हॉटेल निसर्ग परमीट रूम येथे मॅनेजर म्हणून कामकाज करत असून ते रात्री त्याच ठिकाणी झोपला होते. अचानक पहाटे ०२:०० वा. च्या सुमारास अनोळखी काही इसम हॉटेलमध्ये आले व त्यांनी फिर्यादी झोपलेला असल्याचे पाहून त्याचे तोंडावरील चादर ओढली व त्यातील एकाने फिर्यादीचे हात व एकाने पाय पकडून मारहाण करून हातास दोरीने बांधून, पायास टॉवेलने बांधून फिर्यादीच्या तोंडास कापडाने बांधले. यातील फिर्यादी याने कोण आहे ? असे विचारले असता ते काही एक बोलत नसून त्यातील एकाने फिर्यादीचे खिसे तपासून दिवसभर दारू विकून आलेली फिर्यादीच्या खिशातील २०,००० रु. रोख रक्कम व फिर्यादीचा विवो कंपनीचा एस १ कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीस एका रूममध्ये बंद करून बाहेरून कडी लावून हॉटेलमधील विदेशी कंपनीचे दारूचे बॉक्स (इम्पेरीअल ब्लु कंपनीचे २८ बॉक्स प्रत्येकी बॉक्स मध्ये ४८ बॉटल ) असा एकूण २,३१,६०० रु. किंमतीचा ऐवज दमदाटी करून जबरदस्तीने चोरून नेले म्हणून मंद्रप पोलीस ठाणे येथे गुरंन १७/२०२२ का. क ३९५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. भा.द.वि.
.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती. तेजस्वी सातपुते, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री. सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सपोनि सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे, सफौ. खाजा मुजावर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख तसेच मंद्रुप पोलीस ठाणेचे सपोनि नितिन थेटे, अविना पाटील, प्रमोद असादे, राहूल महिंद्रकर यांनी बजावली आहे.

Post a Comment

0 Comments