सरकारी नोकरी असणारा नवरदेव बघुन लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिले. जिल्हा परिषद शाळेत शिक्षक मुलाशी अश्विनीचे तिच्या आई-वडिलांनी लग्न करून दिले. पण लग्नानंतर अवघ्या काही दिवसांत असे काही घडले की, त्यामुळे सर्वांनाच एक धक्का बसला. नववधूने टोकाचे पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.
२९ डिसेंबर २०२१ ला अश्विनी आणि हरिदास यांचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले होते. यांच्या लग्नात मोठ्या प्रमाणात खर्च सुद्धा करण्यात आला होता. मात्र, मुलीकडील सर्व उच्च शिक्षित आणि नोकरीवर होते. हरिदास हा यवतमाळ जिल्ह्यातील येथील आहे. गरीब घरातील मुलगा आहे. त्याला २०२० मध्ये शिक्षक म्हणून सरकारी नोकरी लागली होती. तीन वर्षापर्यंत तो शिक्षण सेवेत असल्यामुळे त्याला ६ हजार मानधन मिळत होते. लग्न झाल्यानंतर तो ७ जानेवारीला भाड्याने राहायला आला होता.
पती-पत्नी आणि मुलीची आजी जलालखेडा येथे भाड्याच्या घरात राहू लागले होते. पती रोज वाढोणा येथील जिल्हा परिषद शाळेत जात होता. नववधू गृहिणी असल्यामुळे ती दिवसभर घरी राहत होती. महिलेची आजी तिच्यासोबत राहत होती. परंतु, रविवारी आजी परत गावी केली असता मंगळवारी दुपारी 3 च्या सुमारास अश्विनीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. तिने आत्महत्या का केली याचा उलघडा झाला नव्हता? पण नंतर तिची लिहिलेली डायरी पोलिसांच्या हाती लागली.
0 Comments