सिनेसृष्टीतील क्वचितच एखादा अभिनेता असेल ज्याने ऐश्वर्या रायसोबत काम करण्याचे स्वप्न पाहिले नसेल. अभिनेता रणबीर कपूरचे हे स्वप्न काही वर्षांपूर्वी पूर्ण झाले. रणबीर कपूरने ऐश्वर्या रायसोबत २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ऐ दिल है मुश्किल या चित्रपटात स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटात रणबीर कपूरने ऐश्वर्यासोबत रोमान्सही केला होता.
रणबीर कपूरला एका मुलाखतीत या चित्रपटात ऐश्वर्यासोबत रोमान्स करण्याबाबतचा अनुभव विचारला होता. यावर उत्तर देताना रणबीर कपूर म्हणाला, “त्यावेळी मला लाज वाटत होती. माझे हात थरथरत होते.
कधी कधी तर मी तिच्या गालाला स्पर्श करायलाही घाबरायचो.” त्यावेळी ऐश्वर्या मला म्हणाली, “हॅलो, नेमकी समस्या काय आहे? आपण अभिनय करत आहोत. तो नीट कर. यानंतर मी विचार केला की पुन्हा अशी संधी कधीच मिळणार नाही. त्यानंतर मी तो सीन केला.”
दरम्यान रणबीरच्या या वक्तव्यानंतर तो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अनेक रिपोर्टसनुसार, रणबीरची ही कमेंट बच्चन कुटुंबाला अजिबात आवडली नव्हती. जेव्हा हे प्रकरण वाढत असल्याचे त्याला जाणवले, त्यानंतर रणबीरने एक निवेदन जारी केले होते.
“मी ऐश्वर्यासोबतच्या रोमान्सबद्दल जे काही बोललो ते चुकीच्या पद्धतीने घेण्यात आले. ऐश्वर्या ही एक अप्रतिम अभिनेत्री आहे आणि ती एक कौटुंबिक मैत्रीणही आहे. मी तिचा सदैव ऋणी राहीन. मी तिचा कधीही अपमान करू शकत नाही”, असे स्पष्टीकरण रणबीरने यानंतर दिले होते.
0 Comments