बार्शी! वैराग मध्ये विनापरवाना दारू विक्री दोघांविरुद्ध गुन्हा दाखल


वैराग/प्रतिनिधी:

बार्शी तालुक्यातील वैरागमध्ये विनापरवाना बेकायदेशीर रीत्या गावठी दारूची विक्री करणाऱ्या दोघांना विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैराग मधील ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूला बेकायदा दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी पत्र्याच्या शेडमध्ये दारू विक्री करणार्‍या दोघा जणांचा जागीच पकडले व पंचांसमक्ष त्यांच्याकडील आंबट व उग्र वासाचे दारू जप्त करून जागीच नष्ट केली आहे. पोलिसांनी अभिमान जालिंदर मोरे (वय ५२) रा.वैराग, आकाश अंकुश पवार  रा. वैराग ता बार्शी या दोघांविरुद्ध वैराग पोलिसात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments