आमदार रोहित पवार यांच्या दिल्लीवारीत भाजपच्या मंत्र्याच्या भेटीगाठी, राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या?दिल्ली/प्रतिनिधी:

राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. या वारीमध्ये त्यांनी चक्क भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊन राजकीय खलबते केल्याचे बोलले जात आहे.  हा महाविकास आघाडी विरोधात वक्तव्य करणारे आघाडी विरुद्ध बोलणारे मंत्री नारायण राणे यांची मात्र आवर्जून भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यांच्या बरोबर महाराष्ट्रातील राजकारणावरही मनसोक्त भाष्य केल्याचे दिसून आले, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय मंत्री भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन यावेळेस त्यांना देण्यात आली. 

राजकीय विश्लेषक व राजकीय जाणकारांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत, अशा अचानक भेटीमुळे राजकारणामधील नवीन राजकीय नांदी याबाबत चर्चा सुरू झाली आहे. याच वेळी बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. आमदार रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते म्हणून ओळखले जातात विविध विषयांच्या ज्ञानाबरोबरच विविध विषयाचे आकलन रोहित पवार यांना जास्त प्रमाणात आहे, मात्र अचानक दिल्ली वारी बद्दल भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय मंत्री गाठीभेटी घेऊन हात घालण्याचा प्रयत्न करू रोहित पवार यांनी या वेळेस केलेला दिसून येतो.

Post a Comment

0 Comments