सोलापूर! भाजप नेत्यांविरुद्ध वायफळ बडबड बंद करावी उपमहापौर राजेश काळे



सोलापूर/प्रतिनिधी:

सोलापूर महापालिका ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील हे भाजपच्या नेत्यांविरुद्ध वायफळ बडबड करत आहेत त्यांनी ही बडबड बंद करावी, पक्षानेही सुरेश पाटलांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असा टोमणा उपमहापौर राजेश काळे यांनी लगावला आहे.

सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवकांमध्ये वाद असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे मागील काळात उपमहापौर राजेश काळे आणि भाजपाचे जेष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांच्यातही शाब्दिक युद्ध झाले होते यंदा मात्र भाजपने मी उपमहापौर राजेश काळे यांनी सुरेश पाटील यांच्यावर हल्ला चढवत आपले मन मोकळे केले यावेळी राजेश काळे म्हणाले की, सुरेश पाटील स्वतःला पक्षा पेक्षा मोठे समजत आहे भाजपच्या 49 नगरसेवकां पैकी सर्वात वाह्यात नगरसेवक म्हणजे सुरेश पाटील आहेत. त्यांना पक्षाने विरोधी पक्ष नेता, सभागृहनेता, अशी मोठी पदे दिली. याचा विचार त्यांनी करावा आणि खाल्ल्या मीठाला जागावे.

 गेल्या काही वर्षांपासून सुरेश पाटील हे पक्षातील नेत्यांवर आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यांनी एका महापौरांवर विष प्रयोगाचा आरोप केला आहे परत दुसऱ्या महापौरांकडे 20 टक्क्यासाठी बाटली फेकून मारली आहे. असे अनेक प्रकार सुरेश पाटील यांनी केलेले आहेत शहर उत्तर मध्ये आमदार यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर ते निवडून आले आहेत. सुरेश पाटील यांनी आपण कोण आहोत याचा विचार करावा. शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनीही त्यांना पाठीशी घालू नये, त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. सुरेश पाटील स्थायी समिती सभापती असताना हे पद वादाच्या भोवऱ्यात अडकवले, झोन समित्याही झाल्या नाहीत. या सर्व गोष्टीचा आता पक्षाने विचार करावा यापुढे पाटलांना पक्षाने संधी देऊ नये. एकंदरीतच त्यांच्या बोलण्या वरून असे वाटते की नुकताच सुप्रसिद्ध चित्रपट पुष्पा मधील एक डॉयलॉग आठवतो, काळे बोले तो नरेंद्र काळे समजे क्या ? राजेश काळे हू मैं..झुकेगा नहीं.. असे तर काळे म्हणत नसतील.

Post a Comment

0 Comments