खासदार संभाजीराजेंच्या खांद्याला खांदा लावून गेल्या तीन दिवसांपासून मराठा समाजाच्या मागण्यांसाठी संयोगिताराजे आझाद मैदानावर उपस्थित होत्या. संयोगिताराजेंनी माझं न ऐकता उपोषण केलं आणि माझ्यावर गनिमी कावा केल्याचं खासदार संभाजीराजे म्हणाले. संभाजीराजेंनी एका मुलीच्या हातून आंदोलन सोडल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी संयोगिताराजेंनाही रस दिला आणि त्यांचं आंदोलन सोडवलं. खासदार संभाजीराजे गेल्या तीन दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन करत होते.
राज्य सरकारने मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य कराव्यात अशी त्यांनी मागणी केली होती. आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य करत असून त्याची अंमलबजावणी लवकरच करणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर खासदार संभाजीराजेंचे उपोषण सुटलं. खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, "माझ्या पत्नी संयोगिताराजेंनीही माझ्यावर गनिमी कावा केला आहे. त्या दिवसभर उपोषणस्थळी रहायच्या आणि रात्री घरी जायच्या. त्यांनी माझं न ऐकता उपोषण केलं, काहीही खाल्लं नाही."
0 Comments