करमाळा/प्रतिनिधी :
तालुक्यातील पाथुर्डी येथील १७ वर्ष ६ महिन्याच्या एका अल्पवयीन मुलीला पूस लावून पळवून नेले आहे. याप्रकरणी एका अनोळखी संशयित आरोपीविरुद्ध १२ तारखेला गुन्हा दाखल झाला आहे.
यात फिर्यादीने म्हटले आहे की, अल्पवयीन मुलगी घरीच असते. ७ फेब्रुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास शौचास जाते असे सांगून मुलगी गेली. ती बराच वेळ झाला तरी परत घरी आली नाही. त्यानंतर आम्ही तिचा शोध घेतला. परंतु ती मिळून आली नाही. तिची नातेवाईक यांचेकडे ही चौकशी केली परंतु तिचा शोध लागला नाही. तिला अनोळखी व्यक्तीने कशाचे तरी अमिष दाखवून फुस लावून पळवून नेले आहे. तिचे शिक्षण १० वी झाले आहे.
0 Comments