सोलापूर! मार्केट यार्डात तरुणाच्या गुप्तांगावर हल्ला


सोलापूर/प्रतिनिधी:

सोलापूर शहरातीलसिध्देश्वर मार्केट यार्डातील कांदा विभागात किरकोळ कारणावरून ४ ते ५ जणांनी मिळून तरुणाच्या गुप्तांगावर हल्ला करून जखमी केले. अबरार शकील शेख (वय २४, रा. प्लॉट नं. ३२, कमल नगर नवाज हॉटेलच्या मागे हैदराबाद रोड सोलापूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. हा मार्केट यार्डातील कांदा विभागात उभा असताना एक ट्रक कांदा भरत होता त्याच्या ड्रायव्हरला आज ट्रान्सपोर्टवाल्यांची मिटींग आहे ट्रक लोडींग पॉईंटला न लावता बाहेर पार्क कर असे सांगून मोटारसायकलवरून मिरची कट्ट्याकडे निघाला.

त्यावेळी आरोपी रफिक नदाफ, सफवान बागवान, इम्रान नदाफ व त्याचे इतर साथीदार तेथे आले आणि दमदाटी करून शिवीगाळ केले. त्यावरून मी आता पोलीसांकडे तक्रार देतो असे म्हणाल्यावर आरोपींनी मोटारसायकलला लाथ मारून खाली पाडले आणि लाथाबुक्कयाने, दगडाने तसेच लोखंडी रॉडने हल्ला केला तसेच रफिक नदाफ याने छातीवर पाय ठेवून गुप्तांगावर जोरात दाबून पुन्हा पायाने मारहाण करून गंभीर जखमी करून पळून गेले अशी फिर्याद अबरार शेख याने जेलरोड पोलीस ठाण्यात दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.

Post a Comment

0 Comments