बार्शी! विशाल फटे आर्थिक घोटाळ्यात आकडा वाढू शकतो; तक्रारी नोंदवीन्याचे कामकाज सुरू



सोलापूर/प्रतिनिधी:

बार्शी येथील विशाल फटे फसवणूक प्रकरणात राज्य भर गाजलेल्या आर्थिक घोटाळ्यात फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी माहिती देताना सांगितले, हा आकडा कदाचित वाढू शकतो. पोलिसांची तज्ञ टीम तपास करत आहे. आजतागायत 127 तक्रारी आल्या आहेत. आणि सद्यस्थितीत 24 कोटी 84 लाख 11 हजार 520 रुपयांची फसवणूक झाल्याची नोंद झाली आहे. जवळपास 800 तक्रारदार यामध्ये आहेत. या सर्व तक्रारी दाखल झाल्यास फसवणुकीचा आकडा होऊ शकतो.

शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक
बार्शी येथे अनेक सर्वसामान्य नागरिकांना शेअर मार्केटच्या नावाखाली ज्यादा पैसे मिळवून देतो असे आश्वासन देऊन अनेक लोकांना विशालका या कंपनीत पैसे गुंतवण्यास भाग पाडले. बार्शी येथील अनेक सर्वसामान्य नागरिकांनी यामध्ये गुंतवणूक केली होती. मात्र विशाल फटे याने कोणताही परतावा न देता कोट्यावधी रुपये लाटले आहे. फसवणूक झाली असल्याची बाब समोर येताच विशाल फटे हा फरार झाला होता. त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांना अटक होताच त्याने, सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन आत्मसमर्पण केले होते.

जवळपास 800 जणांची फसवणूक
सद्यस्थितीत 127 जणांनी बार्शी पोलीस ठाण्यात विशाल फटे विरोधात फिर्याद नोंदवली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या तापसानुसार 24 कोटी 84 लाख 11 हजार 520 रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये जवळपास 800 जणांना गंडविले आहे, ते सर्व फिर्यादी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद नोंदविली तर फसवणुकीचा आकडा पुढे जाण्याची शक्यता पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी वर्तवली आहे.

विशाल फटे कडून जप्त केला मुद्देमाल 
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने या आर्थिक घोटाळ्यात विशाल फटेचा तीन कोटींचा बंगला ताब्यात घेतला आहे. म्हणजे या बंगल्याची खरेदी विक्री थांबविले आहे. त्याच्या पत्नीचे 5 लाख रुपयांचे सोने हस्तगत केले आहे. तसेच बार्शी येथील एका ओपन प्लॉटची देखील खरेदी विक्री थांबविली आहे. विशाल फटेचे सर्व बँक खाते बंद करण्यात आले आहेत. कागदपत्रे जप्त करून डिसेंबर 2020 पर्यंत सर्व लेखाजोखा ल्या केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments