आत्महत्या करते आहे, मला एकदा शेवटचं पाहून घ्या असं म्हणत एका मॉडेलने हॉटेल्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. गुनगुन उपाध्याय असं या मॉडेलचं नाव आहे. ती जोधपूर येथील रहिवासी आहे. गणेश उपाध्याय असं तिच्या वडिलांचं नाव आहे. गुनगुन उपाध्यायने रातानाडा येथील हॉटेल लॉर्ड्स रूम बुक केली होती. या हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. तिची प्रकृतीचा धोका टळला आहे असंही सांगण्यात येतं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुनगुन मॉडेलिंग करते. ती शनिवारी उदयपूरहून जोधपूरला आली होती. जोधपूरला आल्यानंतर तिने वडिलांना फोनवर सांगितलं की मी आत्महत्या करायला जाते आहे. माझा चेहरा पाहून घ्या. त्यानंतर तिचे वडील गणेश यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी गुनगुनचा मोबाईल नंबर तिच्या वडिलांकडून घेतला. त्यावरून तिचं लोकेशन शोधलं. पोलीस रातनाडा येथील हॉटेलमध्ये पोहचले. मात्र तोपर्यंत गुनगुनने याच हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली होती. ती बेशुद्ध झाली होती. तिला पोलिसांनी तातडीने मथुरादास माथुर रूग्णालयात दाखल केलं.