काही दिवसावर येऊन ठेपलेली नगरपालीका निवडणुकीची मोर्चेबांधणी राजकिय पक्ष करीत आहेत. प्रभागातुन समक्ष उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. यातच रॉष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार हे एका कार्यक्रमानिमीत्त परंडयात आले होते. त्यांनी शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली असता तेथे त्यांचा शिवसेनेचे युवा नेते रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांनी दिलखुलासपणे स्वागत केले. 'त्या ' भेटीने राजकिय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नगरपालीका निवडणुकीच्या तोंडावर ' ती' भेट राजकिय गुढ वाढविणारी ठरली आहे. पवार घराणातील नव्या पिढीतील युवा आमदार रोहित पवार हे परंड्यात एका कार्यक्रमानिमीत्त आले होते. या दरम्यान त्यांनी शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या संपर्क कार्यालयात सेनेचे युवा नेते रणजीत पाटील यांनी रोहीत पवार यांचा सत्कार केला नंतर ते भाजपाचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या निवास्थानी जाऊन त्यांच्या तब्यतेची विचारपुस केली. यावेळी माजी आमदार राहुल मोटे सोबत होते. मात्र आमदार पवार यांनी नगरध्यक्षाची भेट टाळल्याने जाकीर समर्थकात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
नगरपालीका निवडणुकीच्या तोंडावर नगरध्यक्ष पक्ष सोडणार अशी चर्चा सुरु आहे. सौदागर यांनी पक्ष सोडल्यास पक्षाचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे पक्षक्षेष्टी सौदागर यांची नाराजी दुर करतील का असे तर्क वितर्क काढले जात आहेत सौदागर हे राष्ट्रवादीचे शहरातील प्रभावशाली नेते म्हणुन ओळखले जातात त्यांना शहरातील राजकारणाचा मोठा अमुभव असुन आगामी नगरपालीका निवडणुकीत त्यांची भूमिका निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.
प्रत्येक निवडणुकीत माजी आमदार राहुल मोटे हे सौदागर गटाचा विचार घेतात. आतापर्यंत सौदागर यांनी शहरातुन प्रत्येक निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला अधिक मत्ते दिली आहेत त्यामुळे पक्षाला देखील सौदागर यांची गरज आहे.
0 Comments