उस्मानाबाद/प्रतिनिधी;
उस्मानाबाद जिल्ह्यातील एका गावातील एक १४ वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) कुटूंबीयांसह नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यास गेली होती. विवाह सोहळयात तसेच समाप्तीनंतरही ती कुटूंबीयांसह न आढळल्याने अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले असावे. अशा मजकुराच्या मुलीच्या पित्याने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. दं. सं. कलम- ३६३ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
दुसऱ्या घटनेत एक १६ वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीये) गावातील बस स्थानक येथे असतांना ओळखीच्या एका तरुणाने तेथे जाउन, “तु माझ्या सोबत लग्न करण्यासाठी पळुन नाही आलीस तर तुला व तुझ्या आई-वडीलांस ठार मारीन. ” असे तीला धमकावून बळजबरीने फुस लावून तीचे अपहरन केले. यानंतर तीने त्याच्या तावडीतून आपली सुटका करवून घेउन दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. दं. सं. कलम ३६३,३६६,३२३,५०६ सह पोक्सो कायदा कलम १२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
0 Comments