पंढरपूर/प्रतिनिधी:
भाजपच्यावतीने महिला आयोगाकडे अद्यापही कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झालेली नाही. मात्र, राज्यातील सत्ताधारी असो किंवा विरोधक त्यांना एक प्रकारे वैचारिक बैठक असते. मात्र, सध्या वैचारिक भूमिका मांडत असताना कोणाचाही अपमान होणार नाही याची काळजी घेण्याची गरज असल्याचे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पाचवा पर्वातील संवाद मेळाव्याचे आयोजन पंढरपूर येथे केले होते. त्यावेळेस त्यांनी सध्याच्या राजकारणावरून आपली भूमिका स्पष्ट केली. या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक घुले, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बळीराम काका साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते या संवाद मेळाव्याला हजर होते.
राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी संवाद मेळाव्यामध्ये भाजपच्या विरोधात जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, केंद्रीय यंत्रणांचा अशा प्रकारचा वापर करणे गैर आहे. भाजपने जनतेची फसवणूक केली आहे. यावेळेस त्यांनी भाजपकडून महिला वर्गाची सर्वात मोठी फसवणूक झाल्याची टीकाही केली.
0 Comments