बार्शीमध्ये शौचालय आणि मुतारी ची व्यवस्था करा - जागृत बार्शीकर महिला



बार्शी - संविधान उद्देशिका (प्रास्ताविका) मधील दर्जाची व संधीची समानता व संविधान अनुच्छेद १४ नुसार सर्वांना कायद्यापुढे समानता नुसार बार्शी शहर मधील महिलांसाठी शौचालय व मुतारी नसल्यामुळे संविधानाचीच उल्लंघन, त्वरित महिलांसाठी शौचालाय व मुतारी च्या मागण्याचे लेखी उत्तर द्यावे, व लेखी दिले नाही तर १४ फेब्रुवारी २०२२ ला आंदोलन इशारा यासाठी लोकसेवक मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील बार्शी नगरपरिषद यांना बार्शीतील जागृत महिला यांनी निवेदन दिले.

शहर मध्ये महिलांसाठी शौचालय व मुतारी नसणे हे संविधान चे उल्लंघन असून गंभीर बाब आहे.देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्ष झाली तरी अजून महिलांसाठी मूलभूत हक्क मिळाले नाहीत याची खंत महिलांनी निवेदनात मांडली आहे तसेच याची दखल लोकसेवक मुख्याधिकारी बार्शी नगरपरिषद यांनी घ्यावी व आम्हाला न्याय द्यावा अशी तळमळीची विनंती सुद्धा महिलांनी केली. मुख्याधिकारी या सुद्धा एक स्त्री असून महिलांच्या समस्या जाणू शकतात व बार्शी हे मोठी बाजार पेठ आहे. अनेक खेडे गाव मधील महिला सुद्धा बार्शी मध्ये येतात परंतु या समस्यांना त्यांना नेहमी सामोरे जावे लागते याची शहनिशा करण्यासाठी बार्शी शहर मध्ये महिलाच्या समस्या स्वतः जाणून घेतल्या तर मुख्याधिकारी यांना समजून येईल असे बोलताना महिला म्हणाल्या.

मागण्या बाबत लोकशाही नुसार १२ फेब्रुवारी पर्यंत सह्यांची मोहीम सुद्धा घेणार असून संविधानिक हक्काच्या मागण्या त्वरित लिखित व वेळ नमूद करून द्यावे अशी विनंती लोकसेवक मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांना केली.१२ फेब्रुवारी पर्यंत लिखित वेळ नमूद करून मागण्याला उत्तर दिले नाहीत तर १४ फेब्रुवारी २०२२ सोमवार लोकशाही दिवस दिवशी आम्ही बार्शी नगरपरिषद बाहेर मुख्याधिकारी बार्शी नगरपरिषद आणि बार्शी नगरपरिषद विरोधात तीव्र आंदोलन बार्शीमधील महिला आणि पुरुष सहित तसेच सामाजिक संघटन,सामाजिक कार्यकर्ते यांना घेऊन करणार आहोत याची गंभीर दाखल घ्यावी असे निवेदनात मध्ये म्हटले आहे. निवेदन देताना प्रमिला झोंबाडे, रेखा सुरवसे, रेखा सरवदे, आशादेवी स्वामी,रागिनी झोंडे, हेमलता मुंढे, वैशाली ढगे, प्रतिज्ञा गायकवाड या महिला होत्या.तर इतर संघटनेकडून अविनाश कांबळे, दादा पवार,बालाजी डोईफोडे, उमेश नेवाळे हे होते.

पुढील प्रमाणे जाग्रुप बार्शीकर महिलांनी मागण्या केलेल्या आहेत

१)बार्शी शहरमध्ये महिलांसाठी ठिकठिकाणी शौचालाय व मुताऱ्या बांधाव्या.
२)बार्शी शहर मध्ये शौचालय व मुतारी साठी ठराव बार्शी नगरपरिषद सभा मध्ये मंजूर झाले त्याचे नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक विकास १९६५ मधील भाग ३ प्रश्नांची नोंदणी पुस्तक नुसार आमच्या समस्या लोकप्रतिनिधी यानी मांडल्या का नाही याची माहिती साठी सविस्तर इतिरुत्त द्यावे.
३)शौचालय व मुताऱ्या संविधान प्रास्ताविक दर्जाचे व संधीची समानता नुसार पुरुषांप्रमाणे महिलांसाठी मोफत असाव्या.
४) शौचालय मध्ये एक स्वच्छता व सुरक्षा घेणारे बार्शी नगरपरिषद खर्चाने व्यक्ती नोकरी साठी ठेवावे.

Post a Comment

0 Comments