"आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है" अमृता फडणवीसांचा राऊतांना टोमणा



शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईतील शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांना घेऊन भाजपवर हल्लाबोल केला. यानंतर भाजप नेत्यांकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीदेखील राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया दिली. 'आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है', असे ट्विट करत त्यांनी राऊतांना टोमणा मारला आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊत यांना टोमणा मारला. आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है, असे सूचक ट्विट त्यांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटची प्रचंड चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवसेनेच्या वाघाला बिल्ली संबोधल्यामुळे अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments