सोलापूर! जो पर्यंत मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळत नाही,तो प्रयत्न मृतदेह ताब्यात घेणार नाही


सोलापूर स्मार्ट सिटीचे काम करताना आणखीन एका मजुराचा मृत्यू झाला आहे.गुलाबराव राठोड( रा. तिऱ्हे तांडा,उत्तर सोलापूर) असे मयत मजूराचे नाव आहे. स्मार्ट सिटी चा काम करत असताना मड्डी वस्ती येथील दत्त मंदिरासमोर हा अपघात झाला आहे.सोलापुरात स्मार्ट सिटी चे काम युद्धपातळीवर सुरू आहे.शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मड्डी वस्ती येथे सिमेंट पाईप बसविण्याचे काम सुरु होते.गुलाबराव राठोड खाली खोल खड्ड्यात उतरून  काम करत होते.

पण अचानकपणे मातीचा ढिगारा त्यांच्या अंगावर कोसळला.मातीच्या ढिगाऱ्याखाली स्मार्ट सिटीच मजूर गाडला गेला.थोड्या वेळाने लक्षात येताच माती बाजूला केली,आणि जखमी अवस्थेत गुलाबराव राठोड यांना मार्कंडेय सहकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.पण उपचारापुर्वीच मजुराचा मृत्यू झाला होता.मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असून,जो पर्यंत मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळत नाही,तो प्रयत्न मृतदेह ताब्यात घेणार नाही,अशी माहिती मृतांचे नातेवाईक व प्रहार संघटना शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments