बार्शी! राजकीय वैमनस्यातून आमदार राजेंद्र राऊत समर्थकांच्या गाडीची तोडफोड?


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी शहरातील शिवाजी आखाडा येथील  सादिक काझी यांच्या दुकानासमोर उभी असलेली त्यांची टाटा कंपनीची इंडिगो गाडी क्रमांक एम एच २३ वाय २४४३ याची तोडफोड करण्यात आली आहे.
   
सादिक काझी बार्शी चे लोकप्रिय आमदार राजेंद्र राऊत यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात त्यांच्या गाडीवर पुढील बाजूस काचेवर आमदार राऊत यांचा फोटो आहे. आणि याच गोष्टीचा राग मनात धरून बार्शीतील पाच ते सहा समाजकंटकानी गजग्या कलरच्या बुलेट वरती येऊन तु राजाभाऊ राऊत चा प्रचार का करतोस,प्रचार केल्यास किंवा गाडीवर फोटो लावल्यास आम्ही तुझ्या दुकानाची व गाडीची तोडफोड करू आणि तुला या ठिकाणी धंदा करून देणार नाही असे जोरजोराने ओरडत गाडीवर दगडफेक करत निघून गेले.
   
 यामध्ये सादिक काझी यांच्या गाडीची समोरील काच फुटलेली असून दुकानावरती सुद्धा दगडफेक करण्यात आलेली आहे बार्शीतील तमाम व्यापाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला असून प्रशासनाने याची योग्य खबरदारी न घेतल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
 त्याचप्रमाणे बार्शी मधील छोट्या-मोठ्या व्यापारावर होणारे असे भ्याड हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत आम्ही अशा घटनांचा निषेध करतो असे मत व्यापारी संघटनांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments