चंद्रभागा नदी पाणी आरोग्यासाठी हानिकारक, भूजल विभागाचा अहवाल


पंढरपूर/प्रतिनिधी:

वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंगाला महत्त्वाचे स्थान आहे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात येत असतात. मात्र त्याचबरोबर चंद्रभागा तिरी स्नान करून तीर्थ म्हणून प्राशन करतात. चंद्रभागा नदीतील पाणी आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा अहवाल भूजल विभागाच्या वतीने देण्यात आला आहे याबाबतची माहिती वाल्मिकी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिली आहे.

चंद्रभागा नदीचे संत साधुनी आपल्या अभंगांमधून पावित्र्य सांगितले आहे. मात्र गेल्या अनेक वर्षापासून वारकरी संप्रदायाची श्रद्धा स्थान असणारी चंद्रभागा गढूळ पाण्यामुळे खराब झाली आहे. चंद्रभागा नदी पात्रात येणारे पाणी हे मूत्र मिश्रित तसेच घाण, केरकचरा, शेवाळ अशा अनेक मिश्रीत होऊन नदीपात्रात सोडले जाते. पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणारे भाविक हे चंद्रभागा नदीचे पावित्र्य समजून स्नान करतात व तीर्थ म्हणून प्राशन करतात. मात्र भूजल विभागाकडून देण्यात आलेल्या अहवालानुसार हे पाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे नमूद करण्यात आले आहे तरी भाविकांनी या नदीपात्रात आंघोळ करू नये असे आव्हान अंकुशराव यांच्याकडून करण्यात आले आहे.

केंद्र सरकारकडून गंगा नदी स्वच्छ करण्यावर भर दिला जात आहे त्याचप्रमाणे गेल्या दोन वर्षापूर्वी चंद्रभागा सफाई करण्यासाठी नमामी चंद्रभागा हा उपक्रम राबवण्यात आला होता, मात्र हा उपक्रम कागदावरच असल्याचे दिसून येत आहे, मात्र अशा पाण्यामुळे पांडुरंगाच्या नगरीत येणाऱ्या भाविकांसाठी हानीकारक असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments