शिवसेनेचे मुखपत्रातून भाजप वर सडकून टीका; २०२४ च्या सत्तेचा रस्ता महाराष्ट्रातून जाईल



शिवसेनेचं मुखपत्र सामनामध्ये केंद्रावर पुन्हा एकदा टीका करण्यात आली असून, २०२४ नंतर देशात बदल होईल असं म्हटलं आहे. "ज्या राज्यांनी भाजपास मतदान केले नाही त्यांचा सूड घेणे म्हणजे हिंदुत्व नव्हे! पण बदला, सूड घेणे म्हणजे हिंदुत्व, रोज निवडणूक प्रचारात जोरात खोटे बोलणे म्हणजे हिंदुत्व असा प्रकार देशात सुरू झाला आहे. 

समाजवादी पार्टीची निशाणी सायकल. अतिरेकी सायकलवर बॉम्ब ठेवून स्फोट घडवतात म्हणून अखिलेश यादव यांना मत देऊ नका, असले पांचट विनोद करणे म्हणजे हिंदुत्व, असा भ्रम निर्माण करणाऱ्यांना २०१४  सालात देशातील सत्तेवरून दूर करायलाच हवे. दिल्लीचा रस्ता उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जाते. मात्र २०२४ साठीचा दिल्लीचा रस्ता महाराष्ट्रातून जाईल, हे नक्की. ऐक्याची वज्रमूठ निर्माण झाली तर काहीच अशक्य नाही. तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव यांच्या मुंबई भेटीचा हाच अर्थ आहे." असं सामनामध्ये म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments