मुंबई :
राज्यात आगामी महापालिका निवडणुकांवरून राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. अमृता फडणवीस यांनी मुंबईतील वाहतुक कोंडीमुळे घटस्फोट होण्याचं प्रमाण तीन टक्के आहे. त्यावरून राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी, मला वाटतं की आपण हा कॉमेडी टीव्हीसाठी ठेवू असा टोला अमृता फडणवीस यांना लगावला होता.
त्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आदित्य ठाकरेंना जोरदार टोला लगावला आहे. आदित्यजी तुमची ‘दिशा’ चुकतीये, अमृता फडणवीस यांच्यावर टीका करण्यापेक्षा तुमच्या पेंग्विन प्रमाणे चुराडा झालेल्या जनतेच्या पैशांचा हिशोब द्या, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. राठोड, राऊत, परब यांसारख्या पात्रांमुळे शिवसेना हास्यजत्रा बनलीये, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
कितीही वैयक्तिक हल्ले केले तरी आम्ही घाबरणार नाही. चला हवा येऊ द्या, या प्रसिद्ध कॉमेडी शोचंही नाव चित्रा वाघ यांनी घेतलं आहे. आदित्य ठाकरे यांनी अमृता फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेमुळे चित्रा वाघ यांनी ही बोचरी टीका आदित्य ठाकरेंवर केली आहे. राजकीय मंडळी म्हणून आपण जे राजकारण करत आहोत, तेच आपण करत राहु, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.
दरम्यान, मुंबईत किती समस्या आहेत. रस्ते, मेट्रो, एसटी कर्मचाऱ्यांची समस्या. मी एक सामान्य माणूस म्हणून बोलली आहे की, समस्यांकडे लक्ष्य द्या. महावसूली सरकारची जशी कामे आहेत, त्याबाबत सर्व जग बोलतय, त्यांचे अवगुण हे त्यांनी स्विकारायला हवेत, असं अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या.
0 Comments