एका रात्रीचे किती घेतेस विचारणाऱ्याला मुनमुन दत्ताने झाप झापलं



‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या शो मधील अभिनेत्री बबिता ही प्रचंड लोकप्रिय झाली. अभिनेत्री मुनमुन दत्ता हीने बबिताची भूमिका साकारली होती. तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. बबिताचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. तिचे इन्स्टावर लाखो फॉलोअर्स आहेत. त्यामुळे बबिताचे फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल होतात

बबिता ही तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर करत असते. बबितानं तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्या पोस्टवर प्रेक्षकांनी अनेक कमेंट केल्या आहेत. एका व्यक्तीने त्यावर घाणेरडी कमेंट केली आहे. एका रात्रीचे किती घेतेस…,असं त्याने कमेंटमध्ये विचारलं आहे.

दरम्यान, बबिता हीने या कमेंटकडे दुर्लक्ष केलं नाही. तिने कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही. तुझ्यात हिम्मत असेल तर समोर येऊन बोल, असं बबितानं सांगितलं. बबिताने त्याला त्याच्या भाषेतच उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं आहे.

Post a Comment

0 Comments