नितेश राणेंची पोलिसांशी हुज्जत; तणाव वाढला



सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने अखेर नितेश राणेेंचा जामीन अर्ज फेटाळला आहे. जामीन फेटाळला गेल्यानंतर राणे न्यायालयातून निघत असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. यानंतर राणे यांनी पोलिसांना गाडी अडवण्याचे कारण विचारले. यानंतर राणे आणि त्यांचे बंधू माजी खासदार निलेश राणे यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरवात केली. त्यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आल्याने तणाव निर्माण झाला आहे. यानंतर राणे बंधू थेट वकिलांसमवेत पुन्हा न्यायालयात गेले. सध्या ते वकिलांशी चर्चा करीत आहेत.

भाजप आमदार नितेश राणे यांना धक्का बसला आहे. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सोमवारी नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली होती. आज, सत्र न्यायालयाने यावर निकाल दिला. जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात नितेश राणे जिल्हा न्यायालयात दाद मागणार आहेत. 

भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी काल पूर्ण झाली होती. आज सकाळीच नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. परब यांना 4 फेब्रुवारी पर्यंतची न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Post a Comment

0 Comments