भारताच्या विश्वविजयाची पंचमी ! अंडर-19 विश्वचषक जिंकला...

 
भारतीय संघाने इंग्लंडला पराभूत करत पाचव्यांदा अंडर 19 विश्वचषक जिंकला. आँटिगाच्या मैदानात इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून रवी कुमारने सुरुवातीपासून भेदक मारा करत इंग्लंडला धक्क्यावर धक्के दिले. वैयक्तिक पहिल्या आणि इंग्लंडच्या डावातील दुसऱ्या षटकात रवीनं संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर त्याने वैयक्तिक दुसऱ्या षटकात दुसरे यश मिळवून देत इंग्लंडला सुरुवातीलाच बॅकफूटवर ढकलले.

रवी कुमारच्या भेदक माऱ्यानंतर राज बावाने पाच विकेट्स घेत इंग्लंड संघाचे कंबरडेच मोडले. बावाच्या 5 विकेट्स आणि रवी कुमारने 4 विकेटमुळे इंग्लंडच्या संघाचा डाव 189 धावांत आटोपला. या दोघांशिवाय कौशल तांबेला एक विकेट मिळाली. इंग्लंडने भारतीय संघासमोर 190 धावांचे अल्प आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. पण उप कर्णधार राशीदचे संयमी अर्धशतक आणि निशांत सिंधूच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने हे आव्हान 4 विकेट्स राखून पार केले.

Post a Comment

0 Comments