जिल्ह्यातील सर्व नद्यांवर मोठ्या क्षमतेचे बॅरेजेस बांधण्याचे नियोजित असून पहिल्या टप्प्यात भीमा नदीवर प्रत्येकी 12 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले नऊ बॅरेजेस निर्माण केले जातील. जलसंपदा विभागातील 14 हजार पदांची लवकरच भरती प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
सोलापुरातील नियोजन भवन येथील जलसंपदा आढावा बैठकीत जलसंपदामंत्री श्री. पाटील हे बोलत होते. यावेळी आमदार समाधान अवताडे, सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, दीपक साळुंखे-पाटील, जलसंपदाचे सचिव श्री. राजपूत, जलसंपदाचे मुख्य अभियंता श्री. धुमाळ, अधीक्षक अभियंता भीमा कालवा मंडळ डी. ए. बागडे, अधीक्षक अभियंता धीरज साळे आदी उपस्थित होते.
0 Comments