Whatsapp Scam: सावधान, व्हॉट्सअ‍ॅपवर ही लिंक आली तर…


 
एक नवा व्हॉट्सअ‍ॅप स्कॅम  सध्या अनेकांना त्रासदायक ठरतो आहे. Rediroff.com असे त्याचे नाव असून तो गेले काही दिवस व्हॉट्सअ‍ॅप अनेकांच्या अकाऊंटला त्रास देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फसवणारे लोकं, घोटाळा करून तुमच्या बँक आणि कार्ड तपशीलाची माहिती चोरण्याचे काम करत आहे. यामुळे तुमच्या Android आणि iOS स्मार्टफोन बरोबरच Windows PC ला नुकसान होऊ शकते. 

या स्कॅमची सुरूवात कशी झाली हे माहिती नाही. पण, सीएनबीसीने दिलेल्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप युझर्सना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. स्कॅममध्ये युजर्सना महागड्या भेटवस्तूंचे आमिष दाखवले जाते. रिपोर्टनुसार, युजर्सना व्हॉट्सअ‍ॅपवर फसवणूक करणारे एक लिंक पाठवतात. लिंकवर क्लिक केल्यावर एक वेबसाईट उघडते. त्यावर तुम्ही हा फॉर्म भरलात की तुम्हाला बक्षीस मिळेल असे लिहिलेले असते.

तुम्ही प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर, तो फॉर्म वेबसाइटवर पाठवले जातो. तेथे तुम्हाला तुमचे नाव, वय, पत्ता, बँक खाते आणि इतर वैयक्तिक डेटासह त्यांची काही माहिती भरण्यास सांगितले जाते. सर्व डिटेल्स भरल्यानंतर हा डेटा फसवणूक करणाऱ्यांपर्यंत पोहोचतो. स्कॅमर हा डेटा व्यवहार किंवा इतर बेकायदेशीर कामांसाठी वापरतात. स्कॅमर तुमच्या डिव्हाईसवर नको असेलेले एप्लिकेशन्स इंस्टोल करतात.

जर तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर Rediroff.ru कडून काही लिंक आली तर लगेच स्पॅम म्हणून नोंद करा आणि तो हटवा. तुम्ही चुकून त्यावर क्लिक केल्यास कोणत्याही मालवेअर किंवा व्हायरससाठी तुमचे डिव्हाइस स्कॅन करावे.

Post a Comment

0 Comments