U.P. मध्ये काँग्रेसच्या ‘त्या’ 5 चुका, ज्यातून सावरण्यासाठी पक्ष 3 दशकांपासून करतोय प्रयत्नकेंद्रातील सत्तेचा मार्ग युपीतून(U.P.) जातो असं म्हणतात. त्यामुळे सर्वच पक्ष उत्तर प्रदेशात सत्ता मिळवण्यासाठी आग्रही असतात. कधीकाळी काँग्रेसचा गढ असलेला उत्तर प्रदेश सध्या भाजपच्या ताब्यात आहे.मात्र, काँग्रेसची सत्ता जाण्यामागे काय कारण आहेत? युपीतील काँग्रेसचे  तत्कालीन राज्यसभा सदस्य रत्नाकर पांडे यांनी 2011 मध्ये एक विधान केले होते. ते म्हणाले होते, ‘काँग्रेस ही काही दुधाने धुतलेली नाही. त्यांनीही चुका केल्या आहेत.

त्याचा फटका त्यांना सहन करावा लागला.” पांडे यांचे म्हणणे चुकीचे नाही. उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्ष सत्तेबाहेर होऊन जवळपास 33 वर्षे झाली आहेत. राज्यात काँग्रेसचे शेवटचे मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी हे 1988-89 मध्ये होते. तेव्हापासून काँग्रेस प्रत्येक निवडणुकीत पुनरागमनासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.
पण अद्याप त्यांना यश आलेलं नाही. आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या या निवडणुकांमध्ये ते त्यांचे सरकार परत आणण्याचा विचार करत आहेत. मात्र, त्यांची ही योजना यशस्वी होईल, असं सध्या तरी दिसत नसल्याचे जाणकारांना सांगतात. मग प्रश्न येतो की अशा कोणत्या चुका होत्या (ज्याचा उल्लेख रत्नाकर पांडे सारखे नेते करतात) ज्यामुळे आजवर उत्तर प्रदेशात काँग्रेस उठू शकली नाही.

काँग्रेसच्या 5 प्रमुख चुकांवर एक नजर टाकूया. मंडल-कमंडल यांच्यात पक्ष अडकला रत्नाकर पांडे यांच्यासारख्या नेत्यांवर विश्वास ठेवायचा झाला तर एक काळ असा होता की, काँग्रेसचा (Congress) जनाधार प्रत्येक विभागात होता. मग तो दलित असो, आदिवासी असो, मागासवर्गीय असो वा उच्च ब्राह्मण वर्ग. पण पुढे ती मंडल-कमंडल यांच्यात अशी अडकली की तिचा मुख्य समर्थक वर्ग तिच्यापासून दूर गेला.

यात 1990 आणि त्यानंतरची काही वर्षे महत्त्वाची आहेत. एकीकडे उत्तर प्रदेशचे दिग्गज नेते विश्वनाथ प्रताप सिंग (VP Singh) यांनी काँग्रेसपासून फारकत घेत पंतप्रधानपदापर्यंत पोहोचल्यानंतर ‘मंडल आयोगा’च्या (Mandal Commission) शिफारशी लागू करून जातीच्या राजकारणाला वेगळी दिशा दिली. दुसरीकडे, भारतीय जनता पक्ष (BJP) आणि त्यांचे मित्रपक्ष राम मंदिर आंदोलन (कमंडल) तीव्र करत होते. या प्रकारच्या राजकारणाने भाजप, जनता दल, समाजवादी पक्ष (SP), बहुजन समाज पक्ष (BSP) या सर्व पक्षांना चालना दिली आहे कारण त्यांचे अजेंडे स्पष्ट होते.

मात्र, काँग्रेसचे नुकसान होत राहिले. कारण त्यांनी जातीचे, धर्माचे राजकारण करायचे की आपली तटस्थ प्रतिमा मजबूत करायची हेच समजत नव्हते. त्यांनी विचित्र डाव टाकले. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशातील 2012 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्राने आपल्या तत्कालीन आघाडी सरकारकडून मुस्लिमांसाठी 4.5% आरक्षण जाहीर केले. पण हा डाव उलटला.

गोव्यात मोठी घडामोड, मनोहर पर्रीकरांच्या मुलाचं भाजपविरोधात बंड जुळत नसलेल्या युती केल्या, ज्याने फायदा कमी आणि नुकसान जास्त झाले सत्ता परत मिळवण्यासाठी काँग्रेसने अनेक प्रयोग केले. यातीलच एक जुळत नसलेल्या युतींचा वापर. उदाहरणार्थ, राजकीयदृष्ट्या सर्वात महत्त्वाच्या उत्तर प्रदेशातच काँग्रेसने 1996 मध्ये बसपासोबत (BSP) युती केली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

उलट काँग्रेसचे दलित मतदार बसपाकडे वळले. 2017 मध्येही असेच घडले होते, जेव्हा काँग्रेसने सपासोबत (SP) युती करून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (U.P. Assembly Election) लढवली होती. या आघाडीमुळे काँग्रेसच्या (Congress) प्रतिमेला मोठा धक्का बसला. कारण आधी सपाचे नेतृत्व करणाऱ्या अखिलेश यादव यांनी (SP Chief Akhilesh Yadav) काँग्रेसला आपल्या अटींवर आघाडी करण्यास भाग पाडले.

यानंतर निवडणुकीतील दारुण पराभवाचे खापर काँग्रेसवर टाकण्यात आले. पक्षाला प्रभावी नेतृत्वासाठी कोणताही चेहरा आणता आला नाही एक काळ असा होता की उत्तर प्रदेशात काँग्रेसमध्ये (Congress in U.P.) व्हीपी सिंग, एनडी तिवारी असे सर्वच मोठे नेते असायचे. ज्यांना स्वबळावर पक्षाला राज्यासह केंद्रातही सत्तेवर नेण्यात यश आले. 90 च्या दशकात काँग्रेसपासून फारकत घेऊनही व्हीपी सिंह यांनी हा पराक्रम केला होता.

मात्र, अशा नेत्यांनंतर काँग्रेसला उत्तर प्रदेशात कोणतेही प्रभावी नेतृत्व निर्माण करता आले नाही. उलट तिथे असलेले नेतृत्वही हळूहळू बोथट झाले. काँग्रेसचे युवा नेते जितिन प्रसाद यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणे हे त्याचे ताजे उदाहरण आहे. आज स्थिती अशी आहे की उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी पक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Wadra) यांच्या नेतृत्वावर अवलंबून आहे.

जे स्वतः नेहरू-गांधी घराण्यातील सदस्य म्हणून स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण करण्यासाठी धडपडत आहेत. दुसरीकडे भाजप, सपा, बसपा यांसारख्या मोठ्या पक्षांवर नजर टाकली तर प्रत्येकाकडे नेतृत्वाचा स्वतःचा चेहरा आहे. अपना दल सारख्या छोट्या पक्षांनाही अनुप्रिया पटेल यांच्यासारखे स्पष्ट नेतृत्व आहे. CM पदासाठी कोण असेल Congress चा चेहरा?, प्रियंका गांधींनी दिलं स्पष्ट उत्तर तुटलेलं संघटन इतके दिवस सत्तेबाहेर राहिल्याने आणि राज्यपातळीवर प्रभावी नेतृत्वाचा अभाव यामुळे काँग्रेसची संघटना आणि संसाधने नष्ट झाली.


या बाबीकडे योग्य लक्ष दिले गेले नाही. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरच्या मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशातील 58,000 ग्रामपंचायतींपैकी केवळ 20,000 ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसची शाखा कार्यरत होती. म्हणजे एक तृतीयांश पेक्षा कमी. त्याचप्रमाणे तोपर्यंत केवळ 831 ब्लॉक काँग्रेस समित्या कार्यरत होत्या.
त्याचवेळी भाजप, बसपा, सपा यांची गावा-गावात सक्रिय युनिट आहे, त्यांचे कार्यकर्ते आहेत. भाजपकडे प्रत्येक मतदान केंद्राच्या मतदार याद्यांच्या अगदी पन्ना-प्रमुखांची टीम आहे. जवळपास हाच फरक काँग्रेस आणि इतर पक्षांच्या संसाधनांमध्ये आहे. मग ते आर्थिक असो वा तांत्रिक.

धोरण-रणनीती, क्षणोक्षणी बदल याला स्थान नाही स्थानिक नेतृत्व नसल्याने संसाधने आणि संघटना कमकुवत आहे. विरोधी पक्षांचे आव्हान मोठे आहे. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम राज्यातील काँग्रेसच्या धोरणावर आणि रणनीतीवरही दिसून आला. उदाहरणार्थ 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान (Loksabha Election-2019) प्रियांका वाड्रा (Priyanka Vadra) वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवू शकतात असे म्हटले गेले होते.

तेथे त्यांनी मोठी रॅलीही काढली. मात्र, अखेरच्या क्षणी हा निर्णय बदलण्यात आला. यावरून पक्षाला पंतप्रधान मोदींविरोधातील धोका पत्करायचा नाही, असा संदेश गेला. एकच नंबर..!

पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच जगभरात सर्वाधिक पसंती त्याचवेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमेठी तसेच केरळमधील वायनाडमधून (Vaynad, Kerala) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे त्यांना अमेठीतून विजयाची खात्री नसल्याचा आभास निर्माण झाला. आणि तेथूनही हरले. इतकेच नाही तर भाजपची मते कमी व्हावीत म्हणून काँग्रेसने राज्यातील सर्व लोकसभा जागांवर उमेदवार उभे केले होते, असे वक्तव्य प्रियंका यांनी तेव्हा केले होते.

यावरून असे दिसून आले की, राज्यात काँग्रेस(Congress) आता केवळ मतांचा कट रचणारा पक्ष आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांपासून (Assembly Elections) उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार (CM Candidate) म्हणून प्रियंका यांचा प्रचार केला जात आहे. मात्र, ते स्पष्टपणे जाहीर केले जात नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यावरून असे दिसते की उत्तर प्रदेशात काँग्रेसने भूतकाळात केलेल्या चुकांमुळे खूप नुकसान झाले आहे. पण तरीही ते त्यांना सुधारताना दिसत नाही.

Post a Comment

0 Comments