प्रियंका-निकची Good News! सरोगसीद्वारे घरी बाळाचं आगमनमुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने गुड न्यूज दिली आहे. प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांच्या घरी बाळाचं आगमन झालं आहे. प्रियंकाने स्वत:च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर याबाबतची गुड न्यूज शेअर केली आहे. आम्ही सरोगसीद्वारे बाळाचे स्वागत केले आहे. याबाबतची बातमी देताना आम्हाला खूप आनंद होतोय. 

विशेष म्हणजे निक आणि प्रियांकाला याआधी अनेकदा बाळाच्या आगमनाबाबत जाहिरपणे प्रश्नही विचारण्यात आले होते. दोघेही या प्रश्नांना टाळताना दिसत होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्वत: प्रियांकानं आपल्या फॅमिली प्लॅनिंगबाबत भाष्य केलं होतं. 'निक आणि माझ्या मॅरिड लाईफमध्ये बेबीला महत्त्वाचं स्थान आहे. भविष्याचा विचार करून आम्ही दोघांनी प्लॅनिंग केलेलं आहे', अशी प्रतिक्रिया प्रियांकानं दिली होती. एका मुलाखतीदरम्यान दिलेल्या प्रतिक्रियेतून तिनं आई होण्याची इच्छा व्यक्ती केली होती.

कामाच्या गोंधळात मला फॅमिलीपासून दूर राहणं आवडणार नाही. म्हणून आम्ही विचारपूर्वक बेबी प्लॅनिंग केलेलं आहे. भविष्यात मला आई होणं नक्कीच आवडेल पण, आम्हाला सध्या घाई करायची नाही', असं प्रियांका म्हणाली होती.

Post a Comment

0 Comments