रिलेशनशीपमध्ये कोण कशावरून ब्रेकअप करेल काही सांगता येत नाही. आजकाल तर ब्रेकअप म्हणजे अगदी शुल्लक गोष्ट झाली आहे. अनेकवेळा तरूण तरूणी आपल्या पार्टनची एखादी गोष्ट आवडली नाही तरी ब्रेकअप करून टाकतात. मात्र, एका तरुणीनं तिच्या ब्रेकपचं सांगितलेलं कारण ऐकून तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल.
तरुणी एका हॉस्पिटलमध्ये नर्सचं काम करत आहे. तीचं वय 28 वर्ष असून ती मागील 3 वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहे. तरुणीनं सांगितल्यानुसार, तिचा बॉयफ्रेंड तिच्यापेक्षा 1 वर्षाने लहान आहे. तर या तरुणीच्या बॉयफ्रेंडने चक्क तीनं नख वाढवली नाहीत म्हणून तिच्यासोबत सेक्स करण्यास नकार दिला आहे.
तरुणीच्या बॉयफ्रेंडने तिला नखांना सुंदर बनविण्यासाठी एक व्हाऊचर दिलं होतं. मात्र, तरुणी नर्स असल्याने तिला नखं वाढविणं शक्य नव्हतं. त्यामुळे तिने नखं वाढविली नाहीत. त्यानंतर एकेदिवशी जेव्हा तरुणीनं तिच्या बॉयफ्रेंडच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. तर तिच्या बॉयफ्रेंडने तिला दूर ढकललं. त्यावर तरुणीने त्याला कारण विचारलं असता, त्याने नखं न वाढविल्याचं कारण सांगितलं, त्यावर तरुणीला धक्का बसला.
दरम्यान, तरुणीलाही तिच्या बॉयफ्रेंडने सांगितलेलं कारण ऐकून धक्का बसला होता. त्यामुळे तिने अखेर याबाबत तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यावर तिला तज्ज्ञांनी या तरूणाशी ब्रेकअप करण्याचा सल्ला दिला. या तरूणाच्या मनात तुमच्यासाठी प्रेम नसून अहंकार किंवा नियंत्रण करण्याची भावना अधिक आहे, असंही तज्ज्ञांनी सांगितलं. त्यामुळे या तरुणीने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.
0 Comments