दिल्ली:
लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोवरून विरोधक आक्रमक आहेत.याबाबत अनेकदा तक्रारी सुद्धा करण्यात आल्या होत्या.मिळालेल्या माहितीनुसार लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हटवला जाणार आहे.देशातील 5 राज्यांमध्ये निवडणूका जाहिर झाल्यानंतर त्याठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारही सावध झाले आहे.
गेल्या वेळच्या निवडणुकांवेळी कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवरुन झालेला गोंधळ टाळण्यासाठी सरकारने आता तात्काळ पावलं उचलायला सुरुवात केली आहे. त्यानुसार निवडणूक होत असलेल्या 5 राज्यांमधील कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान मोदी यांचा फोटो हटवला जाणार आहे.पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
0 Comments