बार्शी (प्रतिनिधी)- काळ बदलला असून पत्रकारितेमध्ये देखील खूप मोठे बदल झाले आहेत. भांडवलशाहीचा प्रभाव पत्रकारितेवर पडत असला, तरी देखील आज ही प्रामाणिक पत्रकारिता करणारे पत्रकार मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत आणि येणाऱ्या काळात हेच पत्रकार सामाजिक क्रांती घडविण्यासाठी पुढे येतील. पत्रकारितेमध्ये सामाजिक क्रांती घडविण्याची ताकत आहे, असे विचार सोलापूर विद्यापीठाचे मास मीडिया कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख प्राचार्य रविंद्र चिंचोळकर यांनी मांडले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिनाचे औचित्य साधून वृत्तपत्र संपादक संघ व डिजिटल मीडिया प्रेस क्लब यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य रविंद्र चिंचोळकर हे बोलत होते. ते पुढे म्हणाले, इंदिरा गांधी यांच्या सत्तेच्या काळात त्यांनी पत्रकारितेवर घातलेली बंधने हे त्यांची सत्ता उलटून टाकण्यास कारणीभूत ठरले, हे त्यावेळेस झालेल्या निवडणुकीनंतर सिद्ध झाले ही बाब स्वतः इंदिरा गांधी यांनी देखील मान्य केली. पत्रकारितेमध्ये खूप मोठी ताकत असून त्याचा उपयोग समाजाच्या हितासाठी करावा असेही त्यांनी बोलताना सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक शितल बोपलकर या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, सहा. पोलीस निरीक्षक स्वप्निल इज्जपवार, नायब तहसीलदार संजीवन मुंढे, नागेश अक्कलकोटे, बाबासाहेब कथले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विक्रम सावळे, कृषी पर्यवेक्षक गणेश पाटील, उद्योजक कौस्तुभ पेठकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी वृत्तपत्र संपादक संघाचे अध्यक्ष योगेश लोखंडे, कार्याध्यक्ष अभिषेक काकडे, उपाध्यक्ष सौ.सुवर्णा शिवपूरे, सचिव विजय शिंगाडे, सहसचिव किरण नान्नजकर, खजिनदार सौ.संगीता पवार, डिजिटल मिडिया प्रेस क्लबचे अध्यक्ष संदीप मठपती, कार्याध्यक्ष हर्षद लोहार, उपाध्यक्ष मल्लिकार्जुन धारूरकर, सचिव प्रदीप माळी, सहसचिव अजम बागवान, खजिनदार निलेश झिंगाडे तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, संदीप आलाट, अमोल आजबे, राजाभाऊ काकडे, प्रभुलिंग स्वामी, सुहास कांबळे, प्रशांत गायकवाड, रियाज पठाण, सागर गरड, प्रविण पावले यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका निता देव यांनी केले तर आभाार संदीप मठपती यांनी मानले या कार्यक्रमात पोलीस जाणीव संघ महाराष्ट्र यांच्या वतीने कोविड़ योद्धा म्हणून सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संघाचे राहुल वाणी, समाधान विधाते, उमेश आनेराव, अजय तिवारी, मानकोजी ताकभाते, सम्मेद तरटे, सोनू खंडगळे सुप्रिया काशीद, अनुसया आगलावे, रेखा विधाते आदी उपस्थित होते.
0 Comments