अक्कलकोट तालुक्यातील मौजे संगोगी आ येथे एका शेतकर्यांच्या शेतातील असलेले चंदनाची झाडे तोडत असताना त्या शेताचे संबंधित शेत मालक त्याना चंदनची झाडे तोडत असलेल्या दोघा चोरांना शिताफीने आपले ताब्यात घेतले. व त्याना बांधून ठेवले व पुढील कायदेशीर चंदनची झाडे चोरी बाबत दक्षिण पोलिस ठाणे अक्कलकोट येथे दुरध्वनी केले व धरुन ठेवलेल्या दोघा चंदन चोरांना पुढील पोलीस कायदेशीर कारवाई साठी. तात्काळ येउन या दोघा चोरांना घेऊन जाण्याचे सांगितले.
अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाणे चे अधिकारी यानी सम्बदीत मैंदर्गी ओपी अंमलदार ए एस आय श्री प्रविण लोकरे याना आदेश दिले, त्या आदेशाप्रमाणे मैंदर्गी ओपी अंमलदार व सहायक झिरो पोलीस निलप्पा हे दोघे तात्काळ घटनास्थळी हजर झाले व धरुन ठेवलेल्या दोघा युवक चंदन चोरांना मुद्दे मालासह ताब्यात घेतले. व पुढील चंदन चोरी कार्यवाही साठी दक्षिण पोलिस ठाणे अक्कलकोट येथे हजर केले. या समस्त चंदन चोरी बाबत संगोगी आ या गावात एकच खळबळ उडाली आहे.
0 Comments