“गल्लीत क्रिकेट जिंकणारे आता वर्ल्ड कप जिंकू असे म्हणत आहेत”


 सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक  निवडणुकीत भाजपने सरशी मारली आहे. या विजयावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे  यांनी महाविकास आघाडीला टोले लगावले होते. आता अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राणेंवर पलटवार केला आहे.

“गल्लीत क्रिकेट जिंकणारे आता वर्ल्ड कप जिंकू असे म्हणत आहेत, अशा टोला मलिक यांनी राणेंना लगावला आहे. “फर्जीवाड्याचा माझा लढा सुरु राहील. हा माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे. 18 कोटींची डिल 50 लाखांची वसुली याचा काय अहवाल आला आहे? जनतेच्या पैशांवर अधिकारी लोक पैसे वाया घालवतात हे कधीपर्यंत चालणार आहे? आम्ही कोर्टाची लढाई लढू. सत्य समोर येईल,” असा इशाराही मलिकांनी दिला आहे.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. तर महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. त्यामुळे काल राणे पितापुत्रांनी आघाडी सरकारला जोरदार टोलेबाजी केली होती. अज्ञातवासात असलेले नितेश राणे यांनीही सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट शेअर केली होती.

Post a Comment

0 Comments