बार्शी तालुक्यातील पिंपळवाडी येथे रम्मी खेळणाऱ्या पाच जणांविरुद्ध पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र जुगारबंधी अधिनियम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 जानेवारी रोजी दुपारी 12/45वा.चे सुमारास मौजे पिंपळवाडी ता.बार्शी यागावातील एस.टी.बस थांबा लगत असनारे अन्नपुर्णा देवी मंदीराचे समोर आरोपी नामे 1)रामदास योगीराज चौधरी वय 55 वर्षे 2)बालाजी पारसनाथ चौधरी वय 36 वर्षे 3)दत्तात्रय कोडीबा चौधरी वय 62 वर्षे 4)बाळासाहेब आनेबा डागे वय 40 वर्षे 5)आश्रुबा ज्ञानदेव चौधरी वय 37 वर्षे सर्व रा.पिंपळवाडी ता.बार्शी जि.सोलापूर हे बेकायदा बिगर परवाना 106 पानी रमी नावाचा जुगार पैशावर गोलाकार बसुन खेळत असताना जुगाराचे वरील साहित्य व रोख रक्कम 930/-रू.असा माल मिळुन आल्याने त्यांचे विरूध्द सरकार तर्फे महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ)प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल यांच्या पथकाने केली आहे.
0 Comments