बार्शी! गोरमाळातील जेसीबी विक्री प्रकरणी फसवणूक प्रकरणी पांगरी पोलिसात गुन्हा दाखल


बार्शी तालुक्यातील गोरमळेतील जेसीबी मशीन विक्री प्रकरणी फसवणूक झाल्यामुळे एका विरुद्ध पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जयसिंग सिद्राम मोरे वय 35वर्ष, रा गोरमाळे ,ता बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, 25/01/2020रोजी सकाळी 11/00 ते आज दि.18/01/2022रोजी सकाळी 10/00पर्यंत माझाकडे असलेला महिंद्रा आर्ट मास्टर व्हीएक्स ( जेसीबी ) आरटीओ  नं MH-13 DE - 1282 चेसीस नं MDZAA2EEHJ6C49726 असे जेसीबी मशिन 1)बाळासाहेब अजिनाथ बडे रा. माणुर ता. शिरूर जि. बीड यांना 1800000/-लाख रू मध्ये विकलेला होता  त्यावेळेस 400000/-लाख रू रोख व 1400000/-लाख रू असलेले जेसीबी वरील फायनान्स चे हाप्ते जेसीबी विकत घेणारे बाळासाहेब आजीनाथ बडे रा माणुर यांनी भरणेचे ठरलेले होते. व बाळासाहेब बडे यांनी सतत दोन हाप्ते थकवले तर जीसीबी वडुन आणण्याचे व व्यावहार रद्द होईल असा आमचा व्यवहार होवुन ठराव झालेला होता त्याप्रमाणे आम्ही ठराव लिहुन घेतलेला होता आज पर्यंत जेसीबी संदर्भात झालेल्या ठरावा प्रमाणे जेसीबीचा आज पर्यंत एक ही हप्ता बाळासाहेब बडे यांनी भरलेला नाही व मी भरणार नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देत असल्यामुळे व सदरचा जेसीबी हा मला परत देत नाही, म्हणुन बाळासाहेब अजिनाथ बडे रा. मानुर ता. शिरूर जि. बीड यांनी माझा विश्वासघात करून फसवणुक केली आहे. यामुळे पांगरी पोलिसात यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments