मधुबन नर्सरीच्या मॅनेजरचा अपघातात मृत्यू; बोलेरो चालकाविरुद्ध पांगरी पोलिसात गुन्हा


पांगरी/प्रतिनिधी:

गोरमाळे येथिल मधुबन नर्सरी मध्ये मँनेजर म्हणुन मागील चार वर्षापासुन काम असणाऱ्या ओम शिंदे यांचा २० डिसेंबर रोजी कारी आंबेजवळगे रोडवर अपघात झाला. उपचारादरम्यान आठ जानेवारी रोजी ते मयत झाले आहेत, मयतच्या पत्नी नंदिनी ओम शिंदे (वय २९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बोलेरो चालकाविरुद्ध पांगरी पोलिसात भारतीय दंड संहिता कलम २७९, ३०४(अ) मोटार अधिनियम १३४,१८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, २० डिसेंबर रोजी हिरो होंडा कंपनीची पँशनप्रो मोटार सायकल MH-24 AD-3616 व बोलेरो यांच्यामध्ये कारी अंबेजवळगे येथे भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला, बार्शी येथील भगवंत हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे बोलेरो गाडी तिचा आर टी ओ पासींग नंबर  MH -41 C-8928 या बोलेरो गाडीच्या चालकावर मोटरसायकल चालकाच्या मृत्यूस कारणीभूत याप्रकरणी पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही दुःखात असल्यामुळे या घटनेची फिर्याद उशिरा दाखल करत आहे असेही फिर्यादीत नमूद केले आहे.

Post a Comment

0 Comments