बार्शी! कारी मध्ये पाचशे रुपयासाठी आईला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

            
बार्शी/प्रतिनिधी:

उस्मानाबाद जिल्ह्यातील कारी अवघ्या पाचशे रुपयासाठी आईला व भावाला तिघांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. रवि बाळासाहेब बोडके (वय 33) रा कारी ता. जि उस्मानाबाद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे, ३० जानेवारी रोजी सकाळी १०.३० सुमारास फिर्यादी व माझी आई सिंधु असे दोघेजण आमचे घरासमोर बसले असताना भाऊ सागर हा आमचे  जवळ आला, आईला म्हणाला की, तुला वडिलांनी दिलेले ५०० तु माझे बायकोकडे का दिले नाहीस, असे म्हणुन माझी आईचे केसाला धरून हाताने मारहाण करू लागला. म्हणुन मी तु आईला का मारतोस असे म्हणुन सोडवत असताना तेवड्यात माझे वडिल बाळासाहेब अभिमन्यु  बोडके व भावजयी आश्विनी सागर बोडके हे दोघेजण पळत आले व आश्विनी हिने आईला हाताने लाथा बुक्यांनी मारहाण करू लागली व  वडिल बाळासाहेब यांनी तेथेच पडलेला दगड घेवुन फिर्यादीच्या डोक्यात व डावे साईडचे बरगडीवर मारहाण करून जखमी केल्याने चक्कर येवुन पडल्याने वडिल बाळासाहेब बोडके व भाऊ सागर बाळासाहेब बोडके, भावजयी आश्विनी सागर बोडके हे आम्हाला शिवीगाळी करत आत्ता वाचला परत सोडणार नाही. असे म्हणुन तेथुन निघुन गेले. 

त्यानंतर शुद्ध आल्यावर डोकीत व बरगडीवर मार लागुन  डोकीतुन रक्त येवु लागल्याने आई सिंधु बोडके हिने पांगरी पोलीस ठाणे येथे आल्या नंतर दवाखाना यादी  घेवुन ग्रामीण रूग्णालय पांगरी येथे उपचार दाखल करण्यात आले. यामुळे 1) बाळासाहेब अभिमन्यु बोडके 2)सागर बाळासाहेब बोडके 3) आश्विनी सागर बोडके तिघे रा. कारी तिघाजनावर पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments