करमाळा/प्रतिनिधी :
तालुक्यातील शेलगाव क येथे एका व्यक्तीचा खून झाला आहे. घटना घडली आहे. भरत सोमनाथ माने (वय ५७) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी भेट दिली आहे. या खूनाचे कारण अद्याप समजलेले नाही.
खून झालेली व्यक्ती सदर ठिकाणी एकटीच राहत होती. सकाळी परिसरातून काहीजण तिथे पोचल्यानंतर घटना समोर आली आहे. शेलगाव येथील माने हे शेती करण्यासाठी एकटेच शेलगाव परिसरात राहत होते. रात्री स्वतः च्या राहत्या घरी वस्तीवर झोपलेले असताना त्यांचा अनोळखी व्यक्तीने खून केला आहे.
0 Comments