विराट कोहली याने सोशल मीडियावर पोस्ट करत कसोटी कर्णधारदाचा राजीनामा दिला आहे. विराट कोहलीच्या या निर्णयामुळे त्याचे चाहते आणि क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. यापुर्वी विराटने ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरूनही लांब करण्यात आले.
आपल्या ट्विट मध्ये विराट कोहली म्हणाला की, "गेल्या सात वर्षात टीमला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी मी कठीण परिश्रम घेतले. मी माझे काम प्रामाणिकपणे पार पाडले. मात्र, कोणत्याही गोष्टीला त्या वळणावर आल्यावर थांबावे लागते. मला वाटते मला माझे कर्णधारपद सोडण्याची हीच योग्य वेळ आहे. माझ्या या प्रवासात अनेक चढ उतार आले. पण, कशाची कमी भासणार नाही, यासाठी मी पूर्ण प्रयत्न केले. मी प्रत्येक गोष्ट 120 टक्के क्षमतेने देण्याचा विचार करतो. मात्र, माझ्याकडून ती गोष्ट साध्य होत नसेल तर मी माझ्या टीमची फसवणूक नाही करू शकणार."
"मी बीसीसीआयचे आभार मानतो, त्यांनी मला देशाच्या संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी दिली. माझ्या पहिल्या दिवसापासून ज्या सहकाऱ्यांनी साथ दिली आणि माझ्यावर विश्वास ठेवला त्यांचे मी आभार मानतो. रवीभाई आणि मला पाठींबा देणारे हे रेल्वे गाडीच्या इंजिन सारखे राहिले. ज्यांनी सातत्याने कसोटी क्रिकेटला उभारी दिली आहे. शेवटी एमएस धोनीचे आभार मानतो. त्यांनी माझ्यावर कर्णधार म्हणून खूप विश्वास दाखवला. भारतीय संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी मला सक्षम समजले," असेही विराट कोहलीने आपल्या ट्विटमध्ये सांगितले.
0 Comments