"राज्य सरकार मध्ये घर की कोंबडी दाल बरोबर अवस्था" - शिवसेना आमदार शहाजी पाटील



पंढरपूर/प्रतिनिधी: 

महा विकास आघाडी सरकारमध्ये
माढा लोकसभा मतदार संघातील एकाही आमदाराला राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. राज्याच्या महा विकास आघाडी सरकारमध्ये आम्हाला साधे विचारात घेतले जात नाही. त्यामुळे घर की कोंबडी दाल बरोबर अशी अवस्था झाल्याची खंत सांगोला शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केली आहेत. यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी राज्य सरकारला आरसा दाखवण्याचे काम केले असे बोलले जात आहे.

पंढरपूर येथील एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार शहाजीबापू पाटील यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. या वेळी व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचे माढा मतदार संघाचे खासदार रणजित नाईक निंबाळकर, भाजप नेते प्रशांत परिचारक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याण काळे यांच्यासह अनेक महा विकास आघाडीतील नेते उपस्थित होते.

माढा लोकसभा मतदारसंघातील एकाही आमदाराला महा विकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद दिले गेले नाही. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे अनेक इच्छुकांची मंत्रीपदाची संधी हुकली आहे. माढा विधानसभेचे आमदार बबनराव शिंदे यांना तरी मंत्रिपदासाठी वर्णी लागावी अशी अपेक्षा होती

केंद्रातील पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

यांची वर्णी लागावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावर्षी तरी खासदार नाईक यांना मंत्रीपद मिळावे  अशी इच्छा आहे शिवसेनेचे आमदार पाटील यांनी व्यक्त केली. अशाप्रकारे शिवसेनेच्या आमदाराने महा विकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments